Deepak Kesarkar : ‘ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा राजकीय वारसदार…’, दीपक केसरकराचं मोठं वक्तव्य

| Updated on: Nov 17, 2024 | 4:07 PM

ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी मोठं वक्तव्य केले आहे.

ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी मोठं वक्तव्य केले आहे. तर माझा राजकीय वारसदार मुलगी सोनाली नाही, असे म्हणत लवकरच माझा राजकीय वारसदार ठरेल, असंही दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे. माध्यमांशी बोलताना दीपक केसरकर म्हणाले, ‘ही माझी शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे पुढच्या काळात राजकीय वारसदार तयार व्हायलाच हवा. तो पक्षाचा असेल मग तो सेना भाजप कोणाचाही असेल ते त्यांचं ठरवतील. त्यामध्ये माझा वारसदार नाही. पक्षाचा वारसदार, पक्षाचा पुढचा होणारा उमेदवार असणार आहे. सोनाली माझा राजकीय वारसदार नाही. माझ्या सामाजिक कामाची वारसदार सोनाली आहे. ही आमच्या कुटुबांची परंपरा आहे.’, असं दीपक केसरकर म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आहे. अशातच प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून आता महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात असताना दीपक केसरकर यांचीही सभा झाली. दीपक केसरकर यांनी यापुढे माझ्या घरातील कोणीही राजकारणात येणार नाही, अशी घोषणा केल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Nov 17, 2024 04:07 PM
‘घड्याळाचे बटण दाबणार…’,अजितदादांच्या राष्ट्रवादीची नवी जाहीरात वादात; निवडणूक आयोगाचा आक्षेप
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं, अर्धा तास गेटवरच अन्…, नेमकं काय घडलं?