ठाकरेंची बसंती, शरद पवारांचा बावला म्हणजे राऊत; शिवसेना नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
गुलाबराव पाटील हे शिंदे गटाचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचा लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. प्रतापराव जाधव यांना चौथ्यांदा शिवसेना पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर आज खासदार प्रतापराव जाधव यांनी अर्ज दाखल केली.
उद्धव ठाकरे यांची बसंती आणि शरद पवारांचा बावला म्हणजे संजय राऊत, असे वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे नेते, मंत्री गुलाबराव पाटील यांनी करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर कडाडून टीका केली आहे. गुलाबराव पाटील हे शिंदे गटाचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचा लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. प्रतापराव जाधव यांना चौथ्यांदा शिवसेना पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर आज खासदार प्रतापराव जाधव यांनी महायुतीच्या नेत्यांसह आपला उमेदवारी अर्ज बुलढाणा लोकसभेसाठी दाखल केला. हा अर्ज दाखल करण्यावेळी गुलाबराव पाटील यांच्यासह आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार डॉ. संजय रायमुलकर, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार संजय गायकवाड, आमदार आकाश फुंडकर आणि आमदार श्वेता महाले हजर होत्या. त्यावेळी गुलाबराव पाटील यांनी भाषणात संजय राऊतांवर टीका केली आहे.
Published on: Apr 03, 2024 03:18 PM