ShivSena 16 MLA Disqualification प्रकरणासंदर्भात मोठी अपडेट, प्रत्यक्ष सुनावणीची तारीख अन् वेळ ठरली

| Updated on: Sep 11, 2023 | 10:51 AM

Shiv sena 16 MLA Disqualification | शिवसेनेच्या अपात्र आमदारांची प्रत्यक्ष सुनावणीची तारीख आणि वेळ ठरली, एकाच दिवशी होणार सर्व शिवसेनेच्या अपात्र आमदारांच्या प्रकरणासंदर्भातील सुनावणी?

मुंबई, ११ सप्टेंबर २०२३ | शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीची तारीख आणि वेळ निश्चित करण्यात आली आहे. येत्या १४ सप्टेंबर रोजी या शिवसेनेच्या आमदारांची सुनावणी होणार असून दुपारी १२ वाजता ही सुनावणी पार पडणार आहे. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्याच समोर एकाच दिवशी सर्व आमदारांची सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे साधारण ३४ याचिका आल्या आहेत. यावेळी प्रत्येक आमदारांचं म्हणण ऐकून घेण्यात येणार आहे तर त्यांच्याकडे असणारे सर्व पुरावे त्यांना यावेळी सादर करता येणार आहे. १४ सप्टेंबर रोजी या सर्व आमदारांची सुनावणी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ही मॅरेथॉन सुनवाणी दिवसभर सुरू राहणार आहे.

Published on: Sep 11, 2023 10:51 AM