अयोध्येत आम्ही बसलो तेव्हा संजय राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येतील हॉटेलमध्ये माझ्या रूममध्ये येऊन एकनाथ शिंदे यंनी विनंती केली होती. तर तुरूंगात जाण्याचे वय राहिले नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले होते, असा दावा संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यावर शिवसेनेकडून काय करण्यात आला पलटवार?
एकनाथ शिंदे यांनी 14 जून 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सत्तेत जाण्यासाठी विनंती केली होती, असं वक्तव्य करत ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला. अयोध्येतील हॉटेलमध्ये माझ्या रूममध्ये येऊन एकनाथ शिंदे यंनी विनंती केली होती. तर तुरूंगात जाण्याचे वय राहिले नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले होते, असा दावा संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर शिवसेनेकडूनही संजय राऊत यांच्यावर पलटवार करण्यात आला आहे. ‘संजय राऊत यांनीच बंड करण्याची भूमिका मांडली होती’, असा दावा शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी केला. बघा संजय राऊत नेमकं काय म्हणाले? त्यावर शिवसेनेकडून काय पलटवार करण्यात आला. बघा व्हिडीओ?
Published on: May 08, 2024 01:58 PM