आता ‘मातोश्री’ उदास हवेली… डरकाळी नव्हे तर फक्त रडण्याचा…; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल काय?

| Updated on: Feb 17, 2024 | 6:04 PM

बाप चोरला, पक्ष चोरला सातत्याने एकच आरोप उद्धव ठाकरे करत आलेत. बाळासाहेब ठाकरे कुण्या एकट्याची मक्तेदारी नव्हती. बाळासाहेब हे तमाम शिवसैनिकांसाठी दैवत होतं. त्या दैवताचं पुण्य तुम्ही विकून टाकलं, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल

कोल्हापूर, १७ फेब्रुवारी २०२४ : कोल्हापूरमधील महा अधिवेशनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. बाप चोरला, पक्ष चोरला सातत्याने एकच आरोप उद्धव ठाकरे करत आलेत. बाळासाहेब ठाकरे कुण्या एकट्याची मक्तेदारी नव्हती. बाळासाहेब हे तमाम शिवसैनिकांसाठी दैवत होतं. त्या दैवताचं पुण्य तुम्ही विकून टाकलं, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तर बाळासाहेब यांचं वास्तव्य असताना ‘मातोश्री’ पवित्र मंदिर होतं आता उदास हवेली झाली आहे. मातोश्रीमधून आता डरकाळी नाहीतर रडण्याचा आवाज येतो, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात केल्याचे पाहायला मिळाले. पुढे ते असेही म्हणाले की, उद्धव ठाकरे दिसतात तसे नाही, त्यांच्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे लपले आहेत. तुमच्यावर आलेली संकट मी छातीवर घेतली आहेत. माझ्याकडे खूप गोष्टी आहे, ज्या वेळेला बोलायची वेळ येईल त्यावेळी मी बोलेल, असा इशाराही शिंदेंनी ठाकरेंना दिला.

Published on: Feb 17, 2024 06:04 PM
भावाच्या बोलण्यानं बहिणीला वेदना, अजित दादांचं ‘ते’ वक्तव्य ऐकून सुप्रिया सुळे म्हणाल्या…
धनंजय मुंडे यांना फटकारलं, आव्हाड यांची पाठराखण; शरद पवार यांची सणसणीत चपराक