काँग्रेसने जाहीरनामा नव्हे तर माफिनामा प्रसिद्ध करायला हवा, मुख्यमंत्र्यांचा घणाघात

| Updated on: Apr 08, 2024 | 10:29 PM

'काँग्रेसने ५० वर्षांच्या काळात जेवढी कामं झाली नाहीत. तेवढी कामं मोदींच्या काळात झाली हा इतिहास जनतेसमोर ताजा आहे. त्यांनी जाहीरनामा जाहीर केलाय पण त्यांच्याकडे ५० वर्षांचा हिशोब मागायला हवा, ५० वर्षात तुम्ही देशाला कुठे घेऊन गेलाय.', असं वक्तव्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हल्लाबोल केलाय.

काँग्रेसने जाहीरनामा नव्हे तर माफिनामा प्रसिद्ध करायला हवा, असं वक्तव्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हल्लाबोल केलाय. तर काँग्रेसकडे ५० वर्षांचा हिशोब मागायला हवा, असंही म्हणत काँग्रेसवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निशाणा साधलाय. ‘काँग्रेसने ५० वर्षांच्या काळात जेवढी कामं झाली नाहीत. तेवढी कामं मोदींच्या काळात झाली हा इतिहास जनतेसमोर ताजा आहे. त्यांनी जाहीरनामा जाहीर केलाय पण त्यांच्याकडे ५० वर्षांचा हिशोब मागायला हवा, ५० वर्षात तुम्ही देशाला कुठे घेऊन गेलाय. आज त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा अधिकार नाही, त्यांनी माफीनामा जाहीर करायला हवा होता. कारण त्यांनी देशाला खड्ड्यात खालण्याचं काम केलंय.’ तर यावेळी उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी देखील राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केलाय. सूर्य, चंद्र आहे तोपर्यंत आमची शक्ती कोणी संपवू शकत नाही. हिंदू धर्मातील शक्तीला संपवण्याचं राहुल गांधींचं स्वप्न धुळीला मिळेल, असं त्यांनी म्हटलंय.

Published on: Apr 08, 2024 10:29 PM
140 कोटी जनता मोदींची फॅन, या निवडणुकीत लावणार… रामदास आठवलेंची शेरोशायरीतून फटकेबाजी
कडू कारले तुपात तळले की साखरेत घोळले, कडू ते कडूच… मोदींचा रोख कुणावर?