विरोधकांना सी व्होटर्सची मजा घेऊ द्या, मुख्यमंत्र्यांचा टोला; यासह जाणून घ्या दिवसभरातील अपडेट्स

| Updated on: Jan 28, 2023 | 10:58 AM

३४ नव्हे ४० जागा जिंकणार, उद्धव ठाकरे यांचा दावा तर किती जागा जाणार असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पलटवार

नुकताच सी-व्होटरचा सर्व्हे जाहीर करण्यात आला असून सी-व्होटर सर्व्हेवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सी-व्होटर सर्व्हे हा सत्ताधाऱ्यांसाठी चिंतेचा असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. सत्ताधाऱ्यांना बहुमताचा आकडा गाठणं देखील कठीण असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

सी व्होटर्सच्या सर्वेनुसार महाविकास आघाडीला लोकसभेत ३४ जागा मिळणार असल्याचे समोर आले असून सी व्होटर्सच्या सर्वेवरून ठाकरे आणि शिंदे गटात एकच खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे. तर ३४ नव्हे ४० जागा जिंकणार, उद्धव ठाकरे यांनी दावा केला आहे तर किती जागा जाणार असे वक्तव्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. ३४ हून अधिक जागा जिंकू तर विरोधकांना सी व्होटर्सची मजा घेऊ द्या, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी टोला लगावला आहे.

Published on: Jan 28, 2023 10:56 AM
स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतची भूमिका भाजपने स्पष्ट करावी- संजय राऊत
मी माझा मालक, कुणाचा गुलाम नाही; भाजपसोबतच्या युतीवर प्रकाश आंबेडकर यांची रोकठोक प्रतिक्रिया