डोळा, लोटा अन्… अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्र्यांची तुफान टोलेबाजी
VIDEO | विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस, सभागृहात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर साधला निशाणा
मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस. या शेवटच्या दिवशी विरोधकांनी सभात्याग केला. मात्र, विरोधकांच्या अनुपस्थितच सभागृहात पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला. विधासनभेच्या इतिहासात विक्रमी कामकाज झाले. वेगवेगळ्या विषयावर पहिल्यादाच मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या. नवीन सदस्यांना संधी दिल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले तर लोकांसाठी परिपूर्ण असा अर्थसंकल्प सादर केला. अधिवेशनादरम्यान अनेक अडचणी आणल्या. सरकारी कर्मचारी संप झाला. लॉन्ग मार्च आला. पण, सरकारने त्यावर योग्य मार्ग काढला. देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृत दिले. पण, ते थोडे थोडे द्यायचे असते लोटा भरून दिले तर… असे म्हणत मुख्यमंत्री विरोधकांना चांगलाच टोला लगावला. यासह शाब्दिक फटेकबाजी करत मुख्यमंत्री म्हणाले, अधिवेशनाच्या निमित्ताने अजित पवारांची डोळा मारण्याची स्टाईल पाहिली. आता त्यांनी कुणाला डोळा मारला, मी त्यांना विचारलं… ते म्हणाले, जाऊद्याना एकनाथ राव. त्यांनी कुणाला डोळा मारला ते सगळ्यांना माहिती आहे. कोण आलं आणि कुणाला डोळा मारला हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही”, अशी शिंदे यांनी खोचकपणे म्हटले.