अयोध्येतील शरयू नदीकाठावर महाआरती, बघा कशी आहे तयारी?

| Updated on: Apr 09, 2023 | 6:50 PM

VIDEO | अयोध्या दौऱ्यावर असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्येतील शरयूतीरी करणार आरती

अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर असून त्यांनी अयोध्येतील राम मंदिरात दाखल होत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी अयोध्येतील लक्ष्मण किल्यावर उपस्थित राहून त्या किल्ल्याला देखील भेट देत पाहणी केली. यावेळी लक्ष्मण किल्ल्यावरील महंतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. या स्वागतानंतर त्यांना धनुष्यबाण आणि मोठी गदा भेट देण्यात आली. एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी लक्ष्मण किल्ल्यावर वेगवेगळ्या उत्तर प्रदेशातील पिठातील संत महंत दाखल झाल होते. यासर्व संत महंतांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा जंगी सत्कार देखील करण्यात आला. यानंतर आता एकनाथ शिंदे हे शरयू नदीच्या दिशेने रवाना झाले आहेत. याठिकाणी मुख्यमंत्री संध्याकाळी शरयू काठी आरती करणार आहेत. या ठिकाणी महाआरतीची जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे.

Published on: Apr 09, 2023 06:40 PM
पुण्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, ‘या’ भागात पावसानं झोडपलं
चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ कधी मिळणार?