शिंदे सरकारकडून किसान सभेच्या मागण्या मान्य, तरीही किसान सभेचे नेते लाँग मार्चवर ठाम
VIDEO | निर्णय अंमलबजावणीपर्यंत शेतकऱ्यांची माघार नाही, किसान सभेच्या लाँग मोर्चाचा निर्धार, बघा काय आहे सद्यस्थिती
ठाणे : किसान सभेच्या मोर्चाचे शिष्टमंडळ आणि शिंदे सरकार यांच्यात काल बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी किसान सभेच्या नेत्यांनी सांगितले आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाही, आणि जर मान्य केल्या तर सरकारकडून त्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हा लाँग मार्च सुरूच राहिल. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील वाशिंद येथे शेतकऱ्यांचा मुक्काम आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत वाशिंद येथे सध्या मुक्कामी हे शेतकरी असणार आहेत. दरम्यान, काल रात्री अवकाळी पावसाचा फटका या मार्चमधील शेतकऱ्यांना मोठा बसला तरी देखील हे सर्व शेतकरी आंदोलन आणि आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. दरम्यान आज किसान सभेच्या मागण्यांवर मुख्यमंत्री विधिमंडळात निवेदन सादर करणार आहे, त्यामुळे पुढे काय होतं याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.