CM Eknath Shinde : राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणार? ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम काय म्हणतात? जाणून घ्या…

| Updated on: Jul 20, 2022 | 1:37 PM

'कोर्टाच्या पुढील सुनावणीपर्यंत आता महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तार लांबणार का, यावर ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम म्हणाले की, कायद्याने आणि राज्य घटनेने मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याला कुठेही हरकत घेतलेली नाही.'

मुंबईः  एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही गटाच्या वकिलांनी आज कोर्टात युक्तिवाद केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईसंबंधी याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात (Supreme court) सुनावणी झाली. याप्रकरणाची सुनावणी येत्या 01 ऑगस्ट पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणार का, असा प्रश्न संपूर्ण राज्याला पडला आहे. कारण ज्या आमदारांच्या अपात्रतेसंबंधीची केस आहे, त्यात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. मुख्यमंत्र्यांचा शपथविधीच बेकायदेशीर आहे, त्यामुळे पुढे मंत्रिमंडळ विस्तार होणार की नाही, असा प्रश्न विचारला जातोय, यावर कायद्याचे तज्ज्ञ ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यांनी नेमकं काय म्हटलंय. ते जाणून घ्या…

 

Published on: Jul 20, 2022 01:37 PM
VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 20 july 2022
Pune School Van Fire | पुण्यात स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतला –