मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पैठणमध्ये शक्तीप्रदर्शन
पैठणमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सभेपूर्वीचा एकनाथ शिंदे हे उपस्थित कार्यकर्त्यांना अभिवादन करताना पहायला मिळत आहेत.
पैठणमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सभेपूर्वीचा एकनाथ शिंदे हे उपस्थित कार्यकर्त्यांना अभिवादन करताना पहायला मिळत आहेत. सभेसाठी मुख्यमंत्री औरंगाबादहून पैठणसाठी रवाना झाले आहेत. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लोकांची मोठी गर्दी दिसत आहे. या उपस्थित नागरिकांनी मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलं. सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विविध कारणांमुळे या सभेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.