Devendra Fadnavis : ‘त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे, असं आम्हालाही वाटतं पण…’, उदयनराजेंच्या ‘त्या’ मागणीवर मुख्यमंत्री काय म्हणाले?

Devendra Fadnavis : ‘त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे, असं आम्हालाही वाटतं पण…’, उदयनराजेंच्या ‘त्या’ मागणीवर मुख्यमंत्री काय म्हणाले?

| Updated on: Apr 12, 2025 | 1:41 PM

आपल्यातील तेज जागवण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. आठरापगड जातीच्या लोकांना एकत्र करून त्यांनी आपल्यातील तेज जागृत केले. मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापन केली. संपूर्ण भारतात केवळ शिवाजी महाराजांमुळे भगव्याचं राज्य आलं असल्याचं फडणवीस म्हणाले.

शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा आणि मराठा साम्राजाच्या इतिहासाचा ज्यांनी अभ्यास केला, जगभरातील पुरावे मिळवून हा इतिहास समजून घेतला, इतिहासाचं वाचन आणि लेखन केलं. ते गृहमंत्री अमित शाह आले आहेत. ते गृहमंत्री म्हणून आले नाहीत शिवाजी महाराजांचे सेवक आणि मराठा इतिहासाचे संशोधक म्हणून आले असल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी उदयनराजेंनी केलेल्या स्मारकाच्या मागणीवर बोलताना म्हटलं, ‘उदयनराजेंनी काही मागण्या केल्या. आम्ही त्यावर चर्चा केली. महाराजांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे असं आम्हालाही वाटतं. पण आपण लोकशाहीत आहोत. आपण अपमान करणाऱ्यांवर कडक कारवाई करू. आपण प्रमाण इतिहास शिकवणार आहोत. शिवाजी महाराजांचं स्मारकाचा विषय आता सर्वोच्च न्यायालयातून हायकोर्टात आला आहे. आम्ही कोर्टात या प्रकरणी आम्ही लढा देऊ.’

पुढे फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत का आहेत. कारण देशात मोगलाई होती, आदिलशाही होती. देशातील राजे राजवाडे कुठे तरी भंग पावत होते. मोडकळीस येत होते. परकीय आक्रमकाचं राज्य कधीच संपणार नाही, अंधकार झाला होता, असं वाटत असतानाच आई जिजाऊंच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांसारखा तेजस्वी सूर्य निर्माण झाला. शिवाजी महाराज नसते तर आपण कोणीच नसतो, असे म्हणत त्यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. 

Published on: Apr 12, 2025 01:41 PM
Amit Shah : शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्…अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
Amit Shah : शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं