CM Satara Visit LIVE| खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचे लॅंडिंग रद्द, मुख्यमंत्री पुन्हा पुण्याकडे रवाना
पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरमधून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत होते. मात्र खराब हवामानामुळे ते साताऱ्यातून पुन्हा पुण्याला परतले आहेत.
मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पाण्याची पातळी वाढल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. सरकार पूरस्थितीचा सामना करण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहेत. पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत:ही विविध भागांचा दौरा करत आहेत. रविवारी चिपळूणचा दौरा केल्यानंतर आज ते हेलिकॉप्टरमधून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचं लँडिग रद्द करण्यात आलं आणि ते साताऱ्यातून पुन्हा पुण्याला परतले आहेत.