Cm Ladki Bahin Yojana : झोल करावा तरी केवढा! लाडकी बहीण 1, अर्ज केले 26 अन् एकाच महिन्यात मिळवले 4 वर्षांचे पैसे
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत एका भाजप नगरसेवकाच्या तक्रारीने एक गैरव्यवहार समोर आला आहे. मूळ महिला एकच पण तिच्या नावे २६ अर्ज करण्यात आले. विविध आधार कार्ड जोडले गेले आणि ३ हजारऐवजी एका व्यक्तीने तब्बल ७८ हजार रूपये मिळवले.
सरकारच्या लाडक्या बहीण योजनेला सातरच्या एका बहाद्दरानं चुना लावलाय. या गैरप्रकारामुळे सरकार खरोखर गरजू महिलांपर्यंत लाभ पोहोचवतंय की नाही? यावर बोट ठेवलं जातंय. घरी बसल्या बसल्या खोटी कागदपत्र देऊन सातारच्या एका महाभागानं लाडक्या बहीण योजनेतून ७८ हजार रूपये लाटले. धक्कादायक म्हणजे एका महिलेच्या तक्रारीनंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. बायको एकच मात्र तिच्या नवरोबानं तिचे वेगवेगळे ड्रेस, हेअरस्टाईल, मेकअप करून तिचे २६ फोटो काढून घेतले. या फोटोसोबत इतर २६ महिलांचे आधार कार्ड जोडून घेतले आणि या योजनेसाठी अर्ज गेले. त्या २६ महिलांचे आधार सोबत स्वतः मोबाईल कार्ड जोडून घेतले. धक्कादायक म्हणजे हे सगळे २६ अर्ज मंजूही करण्यात आले. जिथे फक्त १५०० च्या हिशोबाने ३ हजार रूपये जाणं अपेक्षित होतं तिथे तब्बल ७८ हजार रूपये गेलेत. विधानसभेनंतर कुणाचंही सरकार येवो, मात्र सातारच्या या पठ्ठ्यानं चार वर्षांचे पैसे एकाच दमात पदरात पाडून घेतले. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट