‘लाडक्या बहिणी’ला नवऱ्यानं गंडवलं, एका महिलेच्या नावे 28 अर्ज अन्… ; अखेर ‘त्या’ दाम्पत्याला बेड्या, नेमका काय केला जुगाड?

| Updated on: Sep 04, 2024 | 1:16 PM

Cm Ladki Bahin Yojana : साताऱ्यात एकाच महिलेच्या नावाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 28 अर्ज भरल्याचे समोर आले आहे. साताऱ्यातील खटाव तालुक्यातील मायणी येथील दाम्पत्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी गैरव्यवहार करणाऱ्या दाम्पत्याला अटक केली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत खारघर येथील महिलेचा आधार कार्ड अनधिकृतरित्या वापरल्याची तक्रार पनवेल येथील तहसीलदार कार्यालयात दाखल झाली. सातारा जिल्ह्यातील एका महिलेकडून हा प्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. यानंतर तात्काळ सातारा जिल्हा प्रशासनाने लाडकी बहीण योजने अंतर्गत माहिती घेतली. यानंतर खटाव तालुक्यातील मायणीच्या एका दाम्पत्याने एकाच महिलेल्या नावे 28 अर्ज अनधिकृत पद्धतीने भरल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात वडूज पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. संबंधित संशयित महिला (माहेरचे नाव) प्रतीक्षा पोपट जाधव आणि तिचा पती गणेश संजय घाडगे अशी या दाम्पत्याची नावे आहेत. या प्रकरणांमध्ये दोघांवर अटकेची कार्यवाही पोलिसांनी सुरू केली आहे. याविषयी सातारा जिल्हा प्रशासनाने त्री सदस्य समिती गठित करून संबंधित दाम्पत्याने भरलेल्या अर्जाची पडताळणी केली असता या महिलेने एकाच नावाने गुगल वरून घेतलेल्या वेगवेगळ्या आधार कार्ड नंबरचा वापर करून माणदेशी महिला बँक वडुज शाखेचे खाते अर्जांना संलग्न केले होते. या पडताळणीत 28 अर्जांपैकी एकाच अर्जाची 3000 रुपये रक्कम संबंधित महिलेच्या खात्यावर जमा झाल्याचे निदर्शनास आले आहे. इतर उरलेल्या कोणत्याही अर्जाचे पैसे बँक खात्यात जमा झालेले नसून या प्रकरणाची जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. मात्र या घडलेल्या प्रकारामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Published on: Sep 04, 2024 01:16 PM
MSRTC Employees Strike : ‘लालपरी’चा संप मिटणार की चिघळणार? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीपूर्वी गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत काय म्हणाले?
बाप्पाच्या विसर्जनानंतर गणेश मुर्तीचे फोटो काढणं यंदा पडू शकतं महागात, कारण…