Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणीं’समोर अडचणींचा डोंगर, योजनेला दफ्तर दिरंगाईचा फटका, सर्व्हर डाऊन अन्…
छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तहसील कार्यालयातील अधिकारी वर्गच बारा वाजले तरी कार्यालयात येत नाहीत. गंगापूर तहसील कार्यालयातील तहसीलदार अप्पर तहसीलदार आणि नायब तहसीलदार हे सर्व अधिकारी साडेअकरा ते पावणे बारा वाजले तरीही गायब होते, परिणामी लाडकी बहीण योजनेचा बोजवारा उडाला असल्याचे समोर आले आहे.
एकीकडे राज्य सरकारने महिलांना दिलासा देण्यासाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. मात्र या योजनेचा बोजवारा उडाला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तहसील कार्यालयातील अधिकारी वर्गच बारा वाजले तरी कार्यालयात येत नसल्याने महिलांना वीस ते पंचवीस दिवस प्रमाणपत्र मिळत नाहीत. गंगापूर तहसील कार्यालयातील तहसीलदार अप्पर तहसीलदार आणि नायब तहसीलदार हे सर्व अधिकारी साडेअकरा ते पावणे बारा वाजले तरीही गायब होते, परिणामी लाडकी बहीण योजनेचा बोजवारा उडाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेला दफतर दिरंगाईचा फटका बसला आहे. रहिवासी प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला मिळण्यासाठी लागणार 20 ते 25 दिवस लागताय. तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी प्रमाणपत्र मिळण्यासाठी 20 ते 25 दिवसाचा कालावधी लागणार सांगितलंय. अशातच सर्व्हर डाऊन असल्यामुळे वेळ लागणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. तर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून देण्यासाठी एजंटकडून तीस रुपयांची लूट होतेय. हाच गंगापूर तहसील कार्यालयातील प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय.