महिलांनो… तुमच्याकडे हे कागदपत्रं आहेत का? तरच मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ
महाराष्ट्रातील अनेक राज्यात कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. येत्या १५ जुलैपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याने ग्रामीण भागात तलाठी आणि ग्रामपंचायत कार्यालयात महिलांची मोठी गर्दी होताना दिसतेय. जाणून घ्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांसमोर कोणत्या अडचणी येताय?
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक राज्यात कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. येत्या १५ जुलैपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याने ग्रामीण भागात तलाठी आणि ग्रामपंचायत कार्यालयात महिलांची मोठी गर्दी होताना दिसतेय. तर या योजनेसाठी मुदतवाढ करण्याची मागणी या महिलांकडून करण्यात येत आहे. दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, रहिवासी दाखल्याची आवश्यकता आहे. तसेच जन्माचा दाखला आणि उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता आहे. यासह बँक पासबूकची झेरॉक्स, रेशन कार्ड आणि प्रतिज्ञापत्राची आवश्यकता महिलांना असणार आहे. याच कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांची तहसील कार्यालयात मोठी गर्दी होत आहे. इतकंच नाहीतर उत्पन्नाचा दाखल, डोमेसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी महिलांची गर्दी होतेय. जाणून घ्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांसमोर कोणत्या अडचणी येताय?