Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेबद्दल सगळं काही… प्रत्येक महिला लाभार्थी व्हावी म्हणून नागपुरातील 6 विधानसभेत बॅनर
Cm Ladki Bahin Yojana For Women : नागपूरमधील महिला व बालकल्याण विभागातर्फे लाडकी बहीण योजनेचे होर्डिग्ज लावण्यात आले आहे. या बॅनरवर योजनेच्या अटींपासून नेमका लाभ कुणाला मिळू शकतो? तर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरावं म्हणून कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. याची सविस्तर माहिती या होर्डिंगवर देण्यात आली आहे.
नागपूर शहरातील सहाही विधानसभेत लाडकी बहीण योजनेचे होर्डिंग्ज लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणूकीपूर्वी लाडकी बहीण योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे या लावलेल्या होर्डिंगच्या माध्यमातून दिसतोय. नागपूरमधील महिला व बालकल्याण विभागातर्फे लाडकी बहीण योजनेचे होर्डिग्ज लावण्यात आले आहे. या बॅनरवर योजनेच्या अटींपासून नेमका लाभ कुणाला मिळू शकतो? तर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरावं म्हणून कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. याची सविस्तर माहिती या होर्डिंगवर देण्यात आली आहे. तर नागपूर शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात लाडकी बहीण योजनेचे जास्तीत जास्त लाभार्थी करण्याचा सरकारचा प्रयत्न आणि हेतू असल्याचे हिला व बालकल्याण विभागाकडून सांगितले जात आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा यासाठी कामाला लागली आहे. तर महिलांना लाभ मिळावा म्हणून शनिवार आणि रविवारीही लाडकी बहीण योजनेचे ॲाफलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. तर महिलांकडूनंही लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय.