Ladki Bahin Yojana : आता फक्त एक QR कोड स्कॅन करा आणि लाडकी बहीण योजेनेचे लाभार्थी व्हा, कसं ते बघा?

| Updated on: Jul 15, 2024 | 1:33 PM

लाडकी बहीण योजना जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत पोहोचावे यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मुंबईमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळावा आणि त्यांची अर्जासाठी शोधाशोध होऊ नये म्हणून क्यु आर कोड असलेला पहिला बॅनर..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजनेची संपुर्ण मुंबईत जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजना जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत पोहोचावे यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मुंबईमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळावा आणि त्यांची अर्जासाठी शोधाशोध होऊ नये म्हणून क्यु आर कोड असलेला पहिला बॅनर झळकवण्यात आला आहे. मुंबईतील के इ एम रुग्णालयासमोर राज्यातील पहिला क्यु आर कोड असलेला बॅनर लावण्यात आला आहे. या क्यु आर कोडमुळे लाडकी बहिण योजनेचा फॉर्म डाऊनलोड करून तो मोबाईलवर भरता येणार आहे. तर या शिवाय ऑनलाईन सबमिशनची देखील सुविधा शासनाकडून करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य माता बहिणींना वेळ वाचणार आहे. तर तलाठी किंवा कोणत्याही शाखेत जाण्याची गरज लागणार नाही, ऑनलाइन फॉर्म डाऊनलोड करून ते तलाठी ऑफिसमध्ये सुद्धा सबमिशन करू शकणार आहेत.

Published on: Jul 15, 2024 01:33 PM
तासाभराच्या वेटिंगनंतर भेट, छगन भुजबळ सिल्व्हर ओकवर, शरद पवारांची अचानक भेट का?
सिल्व्हर ओकवरील भेटीत काय झालं? भुजबळ स्पष्ट म्हणाले, शरद पवारांनी मला बोलवलं अन्…