Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा बोजवारा… सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप

| Updated on: Jul 05, 2024 | 4:02 PM

सरकारकडून यंदाच्या पावसाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आणि याचाच लाभ घेण्यासाठी सध्या तहसील कार्यालयात गर्दी पाहायला मिळते. मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेत समावेश करण्यासाठी लाभार्थ्यांची तहसीलमध्ये गर्दी होत आहे. परंतु वेबसाईट सर्व्हर बंद असल्याने महिलांना मनस्ताप सहन करावा लागतोय

Follow us on

राज्य सरकारने महिलांना दिलासा देण्यासाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. मात्र या योजनेचा बीडमध्ये बोजवारा उडाला आहे. बीडमध्ये सर्व्हर डाऊन झाल्याने अधिकाऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली आहे. सकाळपासूनच तहसील कार्यालयात नागरिकांनी गर्दी केली आहे. मात्र काम होतच नसल्याने नागरिक हतबल झाले आहेत. तर परळीत मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेत समावेश करण्यासाठी लाभार्थ्यांची तहसीलमध्ये गर्दी होत आहे. परंतु वेबसाईट सर्व्हर बंद असल्याने महिलांना मनस्ताप सहन करावा लागतोय. सरकारकडून यंदाच्या पावसाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आणि याचाच लाभ घेण्यासाठी सध्या तहसील कार्यालयात गर्दी पाहायला मिळते. मात्र या योजनेचे सर्व्हर डाऊन असल्याने महिलांना तासन् तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. परळी तहसील कार्यालयात रेशन कार्ड ऑनलाइन करणे नाव अपडेट करणे यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येतेय. सदर वेबसाईट सुरळीत केली जावी अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जाते आहे.