Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’वरून आदिती तटकरेंचं विरोधकांना थेट प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची तयारी नसून…

| Updated on: Jul 22, 2024 | 2:04 PM

Cm Ladki Bahin Yojana For Women : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगर दौऱ्यावर असून दक्षिण नगर जिल्ह्यातील चार तालुक्यामध्ये पवार दौरा करणार आहे. पारनेर, नगर, श्रीगोंदा आणि कर्जत या तालुक्यामध्ये अजित पवार हे महिलांशी सवांद साधणार आहे. सर्व महिलांनी लाडकी बहीणचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी अदिती तटकरे यांनी केले आहे.

माझी लाडकी बहीण योजना ही विधानसभेची तयारी नसून महिलांना सक्षम करण्याची योजना असल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे. तसेच महिलांसाठी अतिशय चांगली योजना आहे. सर्व महिलांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील अदिती तटकरे यांनी केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगर दौऱ्यावर असून दक्षिण नगर जिल्ह्यातील चार तालुक्यामध्ये पवार दौरा करणार आहे. पारनेर, नगर, श्रीगोंदा आणि कर्जत या तालुक्यामध्ये अजित पवार हे महिलांशी सवांद साधणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे शेवटच्या घटकापर्यत पोहचली पाहिजे या हेतूने उपमुख्यमंत्री हे महिलांच्या अडीअडचणी जाणून घेत आढावा घेणार आहे. तसेच मोफत सिलेंडर, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण यासह अन्य योजनेची माहिती देखील ते यावेळी देणार आहेत. दरम्यान गेल्या दोन दिवसापूर्वी शरद पवार हे अहमदनगर दौऱ्यावर होते आणि आज अजित पवार असल्याने कुठंतरी विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर मोर्चेबांधणी करण्यासाठी हा दौरा असल्याचे म्हणत राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.

Published on: Jul 22, 2024 02:04 PM
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्…
धनंजय मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि…, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप काय?