अमित शाह यांच्यासोबत शिंदे-फडणवीस यांची बंद दाराआड खलबतं, कशावर झाली चर्चा?

| Updated on: May 01, 2023 | 10:45 AM

VIDEO | राज्यातील राजकीय परिस्थितीवर अमित शाह यांच्यासोबत शिंदे-फडणवीस यांची बैठक, कशावर झाली चर्चा?

मुंबई : महाराष्ट्राचे राजकारण (Maharashtra Politics) सध्या चांगलेच तापलेलं दिसत आहे. कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पावरून (Barsu Refinery Project) विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वाद आणि आरोप-प्रत्यारोप सुरू असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बंद दाराआड एक बैठक झाल्याची माहिती समोर येतेय. तर या बैठकीमध्ये पुढील आगामी निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवण्यावर एकमत झाले असल्याचे विश्वसनीय सूत्रांची टीव्ही ९ मराठीला माहिती आहे. तर यावेळी झालेल्या बैठकीत शिंदे फडणवीस यांच्यासोबत अमित शाह यांची राज्यातील राजकीय परिस्थितीवरही काही खलबतं झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, गेल्या १५ दिवसांत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मुंबईमध्ये दुसरा दौरा केल्याचे पाहायला मिळाले. अमित शाह यांच्या या मुंबई दौऱ्यादरम्यान, मोठ्या राजकीय घडमोडी घडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Published on: May 01, 2023 10:43 AM
कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी एकास अटक!; ठाकरे गटाशी काय संबंध?
महाराष्ट्र दिनी कुठं झालं ‘शोले स्टाईल’ आंदोलन, काय केली मागणी?