लाडक्या बहिणींनंतर आता तरूणांसाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?

| Updated on: Jul 17, 2024 | 5:54 PM

शिंदेंकडून राज्यातील तरूणांसाठी एक योजना जाहीर करण्यात आली. या योजनेचं नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं आहे. इयत्ता १२ वी उत्तीर्ण झालेल्या तरूणांना दरमाहा ६ हजार रूपये मिळणार आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना...

Follow us on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यातील तरूणांसाठी मोठी घोषणा करण्यात आली. शिंदेंकडून राज्यातील तरूणांसाठी एक योजना जाहीर करण्यात आली. या योजनेचं नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं आहे. इयत्ता १२ वी उत्तीर्ण झालेल्या तरूणांना दरमाहा ६ हजार रूपये मिळणार आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना ८ हजार रूपये मिळणार असून पदवीधर तरूणांना १० हजार रूपये इतकं मानधन देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली. या मोठ्या घोषणेमुळे राज्यातील तरूणांमध्ये आनंदाचं वातवरण आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तरूणांचे वय हे १८ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे. कोणतंही शिक्षण सुरू असणाऱ्या तरूणांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. बेरोजगार तरूणांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. अर्जदाराचे बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.