फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय, राज्य सरकारचा जीआर

| Updated on: Oct 10, 2024 | 1:27 PM

तुम्हाला घरबसल्या मंत्रिमंडळाचे निर्णय जाणून घेता येणार आहे. कारण आता मंत्रिमंडळाचे निर्णय केवळ एका एसएमएसद्वारे तुम्हाला जाणून घेण्यास मदत होणार आहे. मंत्रिमंडळाचे निर्णय जनतेपर्यंत एसएमएसच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवणार, असा राज्य सरकारकडून एक जीआर काढण्यात आला आहे.

Follow us on

मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या निर्णय एका एसएमएसद्वारे आता जनतेपर्यंत पोहचवण्यात येणार असून त्यासाठी २३ कोटी ७८ लाख ८८ हजारांची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या जीआरनंतर मिंधे सरकारची उधळपट्टी असे म्हणत सामनातून सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.’राज्यातील मिंधे भाजप सरकारने पाच दिवसांच्या सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी तब्बल ९० कोटी रूपयांचे टेंडर काढले असताना आता मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत घेतले जाणारे निर्णय जनतेपर्यंत एसएमएसद्वारे पाठवण्यासाठी २३ कोटींची उधळपट्टी हे सरकार करत आहे’, असे विरोधकांनी म्हटले आहे. आता मंत्रिमंडळाचे निर्णय जनतेपर्यत SMSच्या माध्यामातून पोहोचवण्यात येणार असल्याच्या कामासाठी टेंडर मागवले जाणार आहेत. माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाकडून ही टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठी २३ कोटी ७८ लाख ८८ हजार रुपये इतक्या खर्चाला आज सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे.