मुख्यमंत्र्यांनी पोलीस दिल्लीला पाठवावे: रवी राणा
दिल्लीत असतानाही जर माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करुन माध्यमांमध्ये मी फरार असल्याच्या ज्या बातम्या येत आहेत त्याही चुकीच्या आहेत.
अमरावतीमध्ये जेव्हा 9 तारखेला जेव्हा घटना घडली त्यावेळी मी दिल्लीत होतो, आणि माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचे कारस्थान करण्यात आले आहे. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस आणि प्रशासनाला मी दिल्लीत असल्याचे सर्व कागदपत्रे दाखवली असून सध्या ज्या प्रकारचे माझ्याबाबतीत राजकारण चालू आहे ते चुकीचे असल्याचे मत आमदार रवी राणा यांनी सांगितले. अमरावती शहराच्या विकासासाठी आणि विविध कार्यक्रमासाठी मी दिल्लीत असताना माझ्यावर आरोप करुन गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीत असतानाही जर माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करुन माध्यमांमध्ये मी फरार असल्याच्या ज्या बातम्या येत आहेत त्याही चुकीच्या आहेत. अमरावतीच्या घटनेबद्दल मी दोषी असेल तर मुख्यमंत्र्यांनी पोलीस दिल्लीला पाठवावे असे मत व्यक्त केले आहे.