Spcial Report | नारायण राणे-उद्धव ठाकरेंमधला दुरावा.. आणि नार्वेकरांची खुर्ची
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातली टशन चिपी विमानतळावरही दिसली. विमानतळाच्या कोनशिलेच्या अनावरप्रसंगी उद्धव ठाकरे, नारायण राणे, अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि इतरही मंत्री उपस्थित होते
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातली टशन चिपी विमानतळावरही दिसली. विमानतळाच्या कोनशिलेच्या अनावरप्रसंगी उद्धव ठाकरे, नारायण राणे, अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि इतरही मंत्री उपस्थित होते. यावेळी नारायण राणे आणि अजित पवार यांनी एकाच वेळी एकमेकांना नमस्कार घातला. बाळासाहेब थोरात आणि राणेंनीही एकमेकांना नमस्कार घातला. पण ना उद्धव ठाकरेंनी राणेंकडे बघितलं ना राणेंनी उद्धव ठाकरेंकडे पाहिलं. एकंदरितच तेरे भी चुप-मेरे भी चुप असा प्रसंग उपस्थितांनी अनुभवला.