Special Report | युती, आघाडीचा विचार करू नका, पक्ष बळकट करा, मुख्यमंत्र्यांचे शिवसैनिकांना आदेश

| Updated on: Jul 08, 2021 | 10:06 PM

मुख्यमंत्र्यांकडून ‘शिवसंपर्क’ मोहीमेची घोषणा करण्यात आली आहे. येत्या सोमवारपासून म्हणजे 12 जुलैपासून राज्यभर ही मोहीम राबवली जाणार आहे (CM Uddhav Thackeray announce Shiv Sampark Abhiyan In across the Maharashtra)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुखांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून ‘शिवसंपर्क’ मोहीमेची घोषणा करण्यात आली. येत्या सोमवारपासून म्हणजे 12 जुलैपासून राज्यभर ही मोहीम राबवली जाणार आहे. तसेच शाखाप्रमुखांना प्रत्येक घराघरात जाऊन लोकांनी लस घेतली की नाही याची माहिती घेण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यात पंचायत समिती, जिल्हा परिष, नगर परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुका आगामी काळात होऊ घातल्या आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची संवाद यात्रा सुरू असतानाच आता शिवसेनेनेही शिवसंपर्क मोहीम सुरू केली आहे. दुसरीकडे काँग्रेसन आणि भाजपनेही जनमत आपल्याकडे वळवण्यासाठी आंदोलनांचा आधार घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या शिवसंपर्क मोहिमेला अधिक महत्त्व आलं आहे (CM Uddhav Thackeray announce Shiv Sampark Abhiyan In across the Maharashtra)

Published on: Jul 08, 2021 10:06 PM
Breaking | तब्बल 9 तासांच्या चौकशीनंतर एकनाथ खडसे ईडी कार्यालयाबाहेर
Special Report | अमित शाहांकडे सहकार खाते देऊन राज्यात राष्ट्रवादीला वेसण घालण्याचा प्रयत्न?