Dilip kumar Death | भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा तारा निखळला, दिलीप कुमारांच्या जाण्याने उद्धव ठाकरेंना दु:ख
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भावूक झाले. भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा रुपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला..., अशा भावना मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भावूक झाले. भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा रुपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला… अजरामर भूमिका साकारणारे दिलीप कुमार यांचं चित्रपटप्रेम, त्याचं गीतांवरील प्रेम… चाहत्यांच्या हृदयातील त्यांचं स्थान अजरामर राहील, अशा भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरवरुन व्यक्त केलं. दिलीप कुमार यांनी वयाच्या 98 व्या वर्षी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. (CM Uddhav Thackeray Emotional After Dilip kumar Death)