CM Uddhav Thackeray | स्नायू, मणक्यांना दुखापत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया होणार

| Updated on: Nov 10, 2021 | 8:49 AM

उद्धव ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होत आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या सोमवारी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती. तसेच यावेळी त्यांनी काही शारीरिक चाचण्या केल्या होत्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास सुरु झालाय. मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूच्या दुखापतीचा त्रास बळावल्याची माहिती मिळतेय. उद्धव ठाकरे यांना मागील आठवड्यापासून हा त्रास जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांवर येत्या दोन ते तीन दिवसांत महत्वाची शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती मिळतेय. गिरगावमधील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. डॉ. शेखर भोजराज हे मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

उद्धव ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होत आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या सोमवारी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती. तसेच यावेळी त्यांनी काही शारीरिक चाचण्या केल्या होत्या.

Published on: Nov 10, 2021 08:49 AM
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 10 November 2021
Pandharpur | कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी 2 विशेष रेल्वेगाड्यांची सुविधा