Dahi Handi | दोन डोस घेतलेल्यांना दहीहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी द्यावी, गोविंदा पथकांची मागणी
दहीहंडी सण थाटामाटात साजरा करण्यायासाठी शासनाने परवानगी द्यावी नाहीतर आम्ही आंदोलन करु, अशी आक्रमक भूमिका काही दही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि विरोधी पक्ष भाजपने घेतली.
सणांसंबंधी आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. आपले सण आपण जपलेच पाहीजेत… पण आता प्रश्न आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचारच प्राधान्यांना करावा लागेल, असं म्हणत एकप्रकारे दहीहंडी साजरा करण्यावर निर्बंध असतील किंबहुना दहीहंडीसाठी परवानगी नसेल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
त्यानंतर दहीहंडी सण थाटामाटात साजरा करण्यायासाठी शासनाने परवानगी द्यावी नाहीतर आम्ही आंदोलन करु, अशी आक्रमक भूमिका दही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि विरोधी पक्ष भाजपने घेतली. दरम्यान प्रसिद्ध दहीहंडी मंडळ जय जवान पथक आणि माजगाव ताडवाडी यांनी दोन डोस घेतलेल्यांना दहीहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.