Narayan Rane | …म्हणून मी चिपी विमानतळ उद्घाटनप्रसंगी भांडाफोड केला : नारायण राणे
चिपी विमानतळाच्या कार्यक्रमाच्या आदल्यादिवशी नारायण राणे यांनी आपण भांडाफोड करणार, असा इशारा दिला होता. हाच धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी उद्घाटनावेळी नारायण राणे यांच्या कानापाशी जाऊन खोचक टिप्पणी केली होती. तुम्ही भांडी आणलीत का, असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
काही दिवसांपूर्वी चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात शाब्दिक द्वंद्व रंगले होते. यावेळी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांनी एकमेकांवर सडकून टीका केली होती. उद्घाटनावेळी उद्धव ठाकरे नारायण राणे यांच्या कानात काहीतरी बोलले होते. तेव्हा या गोष्टीचा खुलासा होऊ शकला नव्हता. मात्र, नारायण राणे यांनी शुक्रवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत याबाबतचा गौप्यस्फोट केला. चिपी विमानतळाच्या कार्यक्रमाच्या आदल्यादिवशी नारायण राणे यांनी आपण भांडाफोड करणार, असा इशारा दिला होता. हाच धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी उद्घाटनावेळी नारायण राणे यांच्या कानापाशी जाऊन खोचक टिप्पणी केली होती.