Uddhav Thackreay | सीमोल्लंघन केलं असतं तर आज देशात सेनेचा पंतप्रधान असता

| Updated on: Jan 23, 2022 | 10:24 PM

काळजीवाहू विरोधक हे कधीकाळी आपले मित्र होते. 25 वर्ष आपली युतीमध्ये सडली. तेच माझं मत आजही कायम आहे. राजकारण म्हणजे गजकरण आहे, असं बाळासाहेब म्हणायचे. राजकारण म्हणून आता विरोधक आता काहीही खाजवतंय. शिवसेना प्रमुखांनी आपल्याला दिशा दाखवली. हिंदुत्वासाठी सत्ता पाहिजे होती, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

‘मी बाहेर पडणार. महाराष्ट्र पिंजून काढणार. जे विरोधक माझ्या तब्बेतीची काळजी घेत आहे, त्या काळजीवाहू विरोधकांना भगव्याचं तेज दाखवणार. विरोधकांची चिंता करण्याची गरज नाही. काळजीवाहू विरोधक हे कधीकाळी आपले मित्र होते. 25 वर्ष आपली युतीमध्ये सडली. तेच माझं मत आजही कायम आहे. राजकारण म्हणजे गजकरण आहे, असं बाळासाहेब म्हणायचे. राजकारण म्हणून आता विरोधक आता काहीही खाजवतंय. शिवसेना प्रमुखांनी आपल्याला दिशा दाखवली. हिंदुत्वासाठी सत्ता पाहिजे होती’, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

‘गुलाम म्हणून आम्ही राहण्याचं असलेलं तुमचं स्वप्न आम्ही मोडून पाडलं, म्हणजे लोकशाहीचा अपमान? आम्ही चोरुन मारुन शपथ नाही घेतली, उजेडात शपथ घेतली. तुम्ही दिलेलं वचन मोडलं म्हणून आम्ही नवीन घरोबा केला. सरकार फोडून आमदार फोडून तुम्ही सरकार केलं. फोडाफोडी करुन सांगायचं की बघा आम्ही कसे लोकशाहीवादी आहोत, असे आम्ही नाही. काल परवा ज्या निवडणुका झाल्या, बँका, नगरपंचायती, विधानपरिषदेच्या निवडणुका असतील, महाराष्ट्र सोडूनही आपण आता निवडणुका लढवायचा. खरं हिंदुत्व घेऊन आपण पुढे जाऊ. हरलो तरी खचायचं नाही. आणि जिंकलो तरी डोक्यात हवा जाऊ द्यायची नाही. आता झालेल्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या’, असंही ठाकरे म्हणाले.

शिवसेनेची 25 वर्ष युतीत सडली, उद्धव ठाकरेंचा भाजपावर जोरदार हल्लाबोल
Uddhav Thackeray Speech : 25 वर्ष युतीत सडली मग 2 वर्षात शिवसेना वाढली का?, प्रवीण दरेकर यांचा सवाल