CM Kolhapur PC LIVE | पॅकेज देणारा नाही, मी मदत करणारा मुख्यमंत्री : उद्धव ठाकरे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमधील पूर परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर प्रशासनासमवेत आढावा बैठक घेऊन पत्रकार परिषदेत महत्त्वाच्या सूचना दिल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळपासून कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे कोल्हापूरमधील पूर परिस्थितीची पाहणी केली त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत सूचना केल्या. ‘मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही तर मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे. मी ह्याच्या आधी देखील सांगितलं आहे की मी सवंग लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही. मपण सगळ्या पूरग्रस्तांना मदत नक्की करेन,’ असा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोल्हापुरात बोलताना केला.