Maratha Reservation | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधानांना भेटणार; मराठा आरक्षणावर होणार चर्चा, सूत्रांची माहिती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधानांना भेटणार; मराठा आरक्षणावर होणार चर्चा, सूत्रांची माहिती Uddhav Thackeray Narendra Modi
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मराठा आरक्षणावर होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे मोदी-ठाकरे यांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट मिळावी म्हणून पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली होती. पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती मान्य केली असून उद्धव ठाकरे यांना उद्या मंगळवारी भेटीची वेळी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्याशी मराठा आरक्षणावर चर्चा करतील. यावेळी आघाडी सरकारमधील काही मंत्री त्यांच्यासोबत असतील अशी माहिती सूत्रांनी दिली.