Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेवर शस्त्रक्रिया होणार ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास सुरु झालाय. मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूच्या दुखापतीचा त्रास बळावल्याची माहिती मिळतेय. मुख्यमंत्र्यांना मागील आठवड्यापासून हा त्रास जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांवर येत्या दोन ते तीन दिवसांत महत्वाची शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती मिळतेय. गिरगावमधील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास सुरु झालाय. मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूच्या दुखापतीचा त्रास बळावल्याची माहिती मिळतेय. मुख्यमंत्र्यांना मागील आठवड्यापासून हा त्रास जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांवर येत्या दोन ते तीन दिवसांत महत्वाची शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती मिळतेय. गिरगावमधील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. डॉ. शेखर भोजराज हे मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होत आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या सोमवारी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती. तसेच यावेळी त्यांनी काही शारीरिक चाचण्या केल्या होत्या.
पालखी मार्गाच्या कार्यात सर्वतोपरी सहकार्य करेल- मुख्यमंत्री
पालखी मार्गाचा विकास करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. ऊन, वारा, पाऊस आणि खड्ड्यांची पर्वा न करता आपल्या वारकऱ्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्याची आपली जबाबदारी आहे. यासाठी महाराष्ट्र प्रत्येक पाऊलावर तुमच्यासोबत आहे हे वचन मी या निमित्ताने देऊ इच्छितो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. पालखी मार्ग भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हीसीवरून संवाद साधला.