Kolhapur Floods | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर जाणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे उद्या 29 जुलैला पूरग्रस्त कोल्हापूर (Kolhapur Rains) भागाचा दौरा करणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे उद्या 29 जुलैला पूरग्रस्त कोल्हापूर (Kolhapur Rains) भागाचा दौरा करणार आहेत. कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढल्याने हाहाकार उडवला. महापुरामुळे अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी कोकणातील तळीये, चिपळूण या भागाचा दौरा केला होता. त्यानंतर आता ते कोल्हापूरचा दौरा करणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे कोल्हापूर शहर, शिरोळ तालुक्याला भेट देणार आहेत.