Uddhav Thackeray | मुसळधार पावसामुळे मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर माघारी, उद्धव ठाकरे पुण्यात दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज पूरग्रस्त सातारा जिल्ह्याला (Satara Rain) भेट देऊन पाहणी करणार आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टर कोयनानगर परिसरातून माघारी फिरलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज पूरग्रस्त सातारा जिल्ह्याला (Satara Rain) भेट देऊन पाहणी करणार आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टर कोयनानगर परिसरातून माघारी फिरलं आहे. सातारा आणि कोयनानगर परिसरात जोरदार पाऊस आणि खराब हवामान यामुळे कोयनानगरातील हेलिपॅडवर लँड होऊ शकलं नाही. त्यामुळे हे हेलिकॉप्टर पुणे विमानतळाकडे माघारी फिरलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यावरुन सकाळी 11 च्या सुमारास कोयनानगरकडे रवाना झालं. 11.30 वाजता ते कोयनानगर हेलिपॅडवर पोहोचणं अपेक्षित होतं. मात्र कोयनानगर परिसरात जोरदार पाऊस आहे. त्यामुळे हे हेलिकॉप्टर लँड होऊ शकलं नाही. त्यामुळे हेलिकॉप्टर पुण्यात परतलं.