Solapur | सोलापुरात सलायनमध्ये निघालं झुरळ,रुग्णांच्या आरोग्याबाबत हलगर्जीपणा
स्वयंपाकगृहात झुरळ आढळणं यात काही नवीन नाही, बऱ्याच गृहिणी या झुरळांच्या त्रासाला कंटाळूनच घरात पेस्ट कंट्रोलही करून घेतात. पण रुग्णालयातील सलायनमध्ये झुरळ आढळलेलं तुम्ही कधी ऐकलं नसेल, पण हे खरं आहे. सोलापुरातील एका रुग्णालयात सलायनमध्ये चक्क झुरळ आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. रु
स्वयंपाकगृहात झुरळ आढळणं यात काही नवीन नाही, बऱ्याच गृहिणी या झुरळांच्या त्रासाला कंटाळूनच घरात पेस्ट कंट्रोलही करून घेतात. पण रुग्णालयातील सलायनमध्ये झुरळ आढळलेलं तुम्ही कधी ऐकलं नसेल, पण हे खरं आहे. सोलापुरातील एका रुग्णालयात सलायनमध्ये चक्क झुरळ आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. रुग्णांच्या जिवांशी कशा पद्धतीनं खेळ सुरू आहे, याचा प्रकारातून उलगडा झालाय.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील डॉ. जगदाळे मामा रुग्णालयात निहिरा नीरज पुराणिक या तीन वर्षीय चिमुकलीला 27 ऑगस्टला ब्राँकायटिस आणि निमोनियाचा त्रास होत असल्याने दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांनी तात्काळ दखल घेत तिला सलायनही चढवले. मात्र त्यातील सलायन ठरावीक कालावधीनंतर नंतर बंद पडत होते, त्यानंतर त्या सलायनची तपासणी केल्यावर त्यात चक्क झुरळ असल्याचं दिसून आलं, त्यामुळे रुग्णालय प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडालीय.