गोवा भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; राणे, सावंत आमने-सामने

| Updated on: Mar 14, 2022 | 10:02 AM

गोव्यात नवनिर्वाचित आमदार विश्वजीत राणे यांनी थेट मुख्यमंत्री सावंताविरोधात पुन्हा दंड थोपटलेत. त्यांना चक्क उघड-उघड आव्हान देण्याचे प्रयत्न सुरू केलेत. आता इतक्या दिवस भाजप विरुद्ध विरोधक असा रंगलेला सामना चक्क भाजप विरुद्ध भाजप असा रंगताना दिसतोय.

विजयाचा निर्भेळ आनंद साजरा करता यायला हवा. मात्र, भाजपला (bjp)गोव्यात (Goa) सध्या तरी तेच जमत नसल्याचे दिसत आहे. येथे आपली सत्ता कायम राखण्यात पक्षाने यश मिळवले. 40 पैकी 20 जागांवर उमेदवार विजयी झाले. अपक्ष उमेदवारांनी भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली. भाजपचा मुख्यमंत्री होण्याची वाट अतिशय सुकर झाली. या विजयाबद्दल विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीसांचे किती म्हणून कौतुक झाले. मात्र, आता मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना पक्षातून विरोध होताना दिसतोय. नवनिर्वाचित आमदार विश्वजीत राणे यांनी थेट मुख्यमंत्री सावंताविरोधात पुन्हा दंड थोपटलेत. त्यांना चक्क उघड-उघड आव्हान देण्याचे प्रयत्न सुरू केलेत.