Raigad Taliye Landslide | तळीयेमध्ये जिल्हाधिकारी निधी चौधरी दाखल; NDRF कडून बचावकार्य सुरु
महाडच्या तळीये येथील दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी या आज घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
महाडच्या तळीये गावात 35 गावकऱ्यांचा दरडीखाली दबून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेला 24 तासांहून अधिक काळ लोटल्यानंतरही दुर्घटनेतील 50 जण अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये 35 महिला, 10 मुलांचा समावेश आहेत. तसेच दहा वर्षाखालील दोन मुलंही या दुर्घटनेत बेपत्ता झाले आहेत. एनडीआरएफच्या तीन पथकाच्या सहाय्याने या ठिकाणी मदतकार्य सुरू असून बेपत्ता गावकऱ्यांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. ही घटना अकल्पनीय आणि अनेपक्षित होती, असंही चौधरी यांनी सांगितलं. महाडच्या तळीये येथील दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी या आज घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.