रामनवमी निमित्तानं थेट कॉफी हाऊसमध्येच युवकांनी केलं हनुमान चालीसा पठण!

| Updated on: Mar 30, 2023 | 9:02 PM

VIDEO | विद्यार्थ्यानी कॉफी हाऊसमध्ये केले हनुमान चालीसा पठण, पण कुठल्या युवकांनी वेधून घेतले अनेकांचे लक्ष

अमरावती : आज देशभरात श्री रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे, याच निमित्ताने अमरावती येथील एका कॉफी हाऊसमध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हनुमान चालीसाचं पुस्तक हातात घेत हनुमान चालीसेचं पठण केल्याचे पाहायला मिळाले. आतापर्यंत विद्यार्थी किंवा तरूण मंडळी कॉफी हाऊसमध्ये कॉफी पिण्यासाठी येतात हे आपल्याला माहित आहे. मात्र अमरावतीत चक्क कॉफी हाऊसमध्येच विद्यार्थ्यांनी मंदिरात न जाता हनुमान चालीसेचं पठण केल्याने या हनुमान चालीसा पठनाची चर्चा अमरावतीसह राज्यभरात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्‍या वर्षी उद्धव ठाकरे यांच्‍या निवासस्‍थानासमोर हनुमान चालीसा पठणाचा आग्रह धरल्‍यानंतर चर्चेत आलेल्‍या खासदार नवनीत राणा यांच्‍या वाढदिवसानिमित्त येत्‍या ६ एप्रिल रोजी अमरावतीत सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला आहे. त्‍या निमित्‍ताने अमरावतीसह राज्यात झळकलेल्‍या पोस्‍टर्सवर नवनीत राणा यांचा उल्‍लेख “हिंदू शेरणी” म्हणून करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा डिवचलं, ‘मातोश्री’बाहेर ‘हिंदू शेरणी’ अशी बॅनरबाजी
अन् मनसे नेते वसंत मोरे पक्षात पुन्हा नाराज, काय आहे कारण?