मुख्यमंत्र्यांच्या आयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लखनऊ विमानतळ सज्ज, बघा सुशोभीकरणाची तयारी
VIDEO | संध्याकाळी ६ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लखनऊ विमानतळावर दाखल होणार असल्याने स्वागतासाठी लखनऊ विमानतळ सज्ज
लखनऊ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसाच्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी पूर्णपणे सज्ज झाली आहे. ठिकठिकाणी बॅनर, होर्डिंग्स आणि पोस्टर्स लावण्यात आले असून लखनऊ विमानतळावर मुख्यमंत्री, आमदार आणि खासदार यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात येत असून मुख्यमंत्र्यांच्या आयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लखनऊ विमानतळावर सुशोभीकरण करण्यात आले आहे. लखनऊ विमानतळावर अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कायम स्वरूपी रंगबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. ज्यावेळी मुख्यमंत्री लखनऊ विमानतळावर दाखल होणार आहेत त्यावेळी त्याच्या स्वागतासाठी या विमानतळावर उत्तर प्रदेश सरकारच्या कर्मचाऱ्यांकडून सजावट करण्यात आली आहे. दरम्यान, संध्याकाळी ६ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लखनऊ विमानतळावर दाखल होणार असून उद्या अयोध्येकडे रवाना होणार आहेत.