‘या मला अटक करा’; ईडीने बजावलेल्या समन्सना संजय राऊतांचं आव्हान
ईडीकडून समन्स बजावल्यानंतर त्यांनी हे आव्हान दिलं आहे. जमीन घोटाळाप्रकरणी संजय राऊतांना ईडीने समन्स पाठलं आहे. उद्या 28 जून रोजी त्यांना ईडी चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.
‘मला आताचा समजले ईडीने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही. या मला अटक करा! जय महाराष्ट्र,’ असं ट्विट संजय राऊतांनी केलंय. ईडीकडून समन्स बजावल्यानंतर त्यांनी हे आव्हान दिलं आहे. जमीन घोटाळाप्रकरणी संजय राऊतांना ईडीने समन्स पाठलं आहे. उद्या 28 जून रोजी त्यांना ईडी चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. आधीच शिंदे आणि ठाकरे गटाचा वाद सुरू असताना आता राऊतांना ईडीने समन्स बजावल्याने चर्चांना उधाण आलंय. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय.
Published on: Jun 27, 2022 01:51 PM