Jayant Patil : ‘दादांचं माझ्यावर लक्ष…’, अजितदादांना उद्देशून जयंत पाटील नेमकं काय म्हणाले की सभागृहात सगळेच हसले
राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांची एकमताने विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सभागृहात मांडण्यात आला.
विधानसभेमध्ये जयंत पाटील आपलं भाषण करत असताना अजित पवार यांनी त्यांची चूक सुधारली. यानंतर अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात झालेल्या संवादानंतर सभागृहात एकच हशा पिकला. राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांची एकमताने विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सभागृहात मांडण्यात आला. यावेळी राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना सभागृहात हास्यविनोद झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी जयंत पाटील बोलत असताना विधानसभा अध्यक्षांची किती जरब असते आणि त्यांचा मान कसा सर्वांनी ठेवला पाहिजे, याची माहिती जयंत पाटील देत होते. त्यासाठी त्यांनी 1990 चा एक किस्सा सांगितला. मधुकर चौधरी विधानसभा अध्यक्ष होते. 1990 साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो, असं जयंत पाटील म्हणाले. त्यावर अध्यक्ष नाही, आमदार, असं अजितदादा म्हणाले आणि त्यांनी त्यांची चूक सुधारली. त्यानंतर जयंत पाटील यांनी तात्काळ करत वाक्य दुरुस्त केलं. पहिल्यांदा मी आमदार झालो. यावेळी जयंत पाटील म्हणाले बघा किती लक्ष आहे माझ्यावर, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी लगावला. तर जयंत पाटील यांना दादांनीही प्रत्युत्तर दिलं. माझं लक्ष आहे. तुम्ही कधी प्रतिसाद देताय? असा सवाल अजित पवार यांनी केला. त्यावर आपल्या पक्षाचं एक वाक्य आहे दादा. योग्यवेळी योग्य निर्णय, असं सूचक विधान जयंत पाटील यांनी केलं आणि सभागृहात एकच हशा पिकला.