Ladki Bahin Yojana : ‘दोन बायका असतील तर…’, ‘लाडकी बहीण’वर हसन मुश्रीफ असं काय म्हणाले की, उपस्थितांना हसू अवरेना

| Updated on: Aug 11, 2024 | 5:40 PM

महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. त्यादिवसापासूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा आहे. राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज केलेत. दरम्यान, या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू आहे. तर येत्या 17 ऑगस्ट रोजी दोन महिन्यांचे 3 हजार रुपये लाभार्थी महिलांना मिळणार आहेत

राज्य सरकारकडून दर महिन्याला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात प्रत्येकी 1500 रुपये जमा होणार आहेत. असातच कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांनी या योजनेसंदर्भात वक्तव्य केले आहे. कोल्हापुरात आज अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. यावेळी हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं. दरम्यान, लाडकी बहीण योजनेवर केलेल्या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. दोन बायका असतील तर नेमक काय करायचे असा सवाल काही लोक विचारात आहेत, पण त्यांनी आवडत्या बायकोला या योजनांचा फायदा मिळवून द्यावा, असं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलं. ‘काही ठिकाणी महिला मला प्रश्न करतात, जर एका पुरूषाला दोन बायका असतील त्यांनी काय करायचं… मी म्हटलं जी लाडकी असेल नवरोबाला तिला या योजनेचा लाभ देऊन टाका…’, असं हसन मुश्रीफ म्हणाले. बघा व्हिडीओ नेमकं काय म्हणाले मुश्रीफ?

Published on: Aug 11, 2024 05:40 PM
तुम्ही सगळं हे थांबवा… ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला अन् मनसेच्या राड्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना इशारा; चुणूक दाखवली… बीडचा बदला ‘मनसे’नं ठाण्यात घेतला