मुंबईकरांना आता मोकळा श्वास घेता येणार, कोणती आहे दिलासादायक बातमी?

| Updated on: Feb 24, 2023 | 10:16 AM

VIDEO | मुंबईकरांना दिलासा, मुंबई शहरातील हवा सुधारली आता कशी आहे हवेची गुणवत्ता, बघा व्हिडीओ

विनायक डावरूंग, मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवा प्रदूषित झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारताना दिसत आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना मोकळा श्वास घेता येणार आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईत दिल्ली पेक्षा वाईट हवा आणि वायू प्रदूषण झाल्याचे पाहायला मिळाले होते. याचा फटका मुंबईकरांना बसला असून त्यांना काही प्रमाणात श्वसनाचे आजार देखील उद्वभवले होते. मात्र आता mमुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब असून आता मुंबईकरांची श्वसनाच्या आजाराची भिती काही प्रमाणात कमी होणार आहे. मात्र असे असले तरी मुंबईतील चेंबूर आणि बीकेसीतील काही भागात हवा प्रदूषित असल्याची नोंद करण्यात आली आहे.

Published on: Feb 24, 2023 10:16 AM
गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा तरुणांची हुल्लडबाजी, पोलिसांनी केला लाठीचार्ज अन्…
मुंबईकरांना आता नो सिग्नल, नो ट्राफिक असा सुसाट प्रवास करता येणार; पण कुठून ते कुठपर्यंत?