टरबूज उत्पादक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या, कुणी केली सरकारकडे मागणी
VIDEO | शेतात नुकसानीची पाहणी आणि सरकारचा वेळकाढूपणा, गारपिटीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी; सरकारकडे कुणी केली आक्रमक मागणी
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात सतत दोन दिवस गारपिटीमुळे टरबूज उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीची शासनाने भरीव मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी केली आहे. वानखेड शिवारात तुळशीराम कुरवाडे यांनी ७ एकर शेतावर टरबूज लागवड केली होती. त्यांनी रात्रं दिवस मेहनत घेऊन बाग फुलवली पंरतु, टरबूज तोडनीपुर्वी अचानक प्रचंड प्रमाणात गारपीट सर्व बाग उध्वस्त झाली. दोन तास झालेल्या गारपिटीमुळे होत्याच नव्हतं झालं असून मेहनतही वाया गेली. यावेळी स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि सरकारने वेळ काढूपणा न करता गारपिटीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा सरकारला राज्यातील शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी दिला आहे.