CM Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 1500 वरून 3 हजार रूपये मिळणार? काय म्हणाले मुख्यमंत्री अन् अजितदादा?
लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना देण्यात येणाऱ्या १५०० रूपयांवरून सत्ताधारी विरोधक आमने-सामने आले आहेत. अशातच १५०० रूपयांचे तीन हजार रूपये करण्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. पुन्हा आशीर्वाद दिला तर तीन हजार रूपये देणार असं मुख्यमंत्री म्हणालेत. तर संजय राऊत यांनीही तीन हजार रूपयांचा वायदा केला आहे.
लाडक्या बहिणीला देण्यात येणाऱ्या १५०० रूपयांचे आता तीन हजार रूपये करण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. पुण्यात लाडकी बहीण योजनेचा सरकारचा कार्यक्रम पार पडला. पुण्यातील कार्यक्रमात सरकारला पुन्हा आशीर्वाद दिलेत तर १५०० रूपयांचे तीन हजार रूपये करू असा वायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. लाडकी बहीण योजनेद्वारे दिले जाणाऱ्या १५०० रूपयांवरून उद्धव ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. गद्दारांना ५० खोके आणि लाडक्या बहिणींना १५०० रूपये अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५०० रूपयांचे तीन हजार रूपये कसे होतील ते सांगितलं. तर अजित पवार यांनी आपल्या स्टाईलमध्ये योजना चालू ठेवायची की नाही ते तुमच्याच हातात असल्याचे सांगून कमळ, घड्याळ आणि धनुष्यबाणावर लक्ष ठेवायला सांगितले.