का होतेय गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी?
अश्लिल हावभाव करत नृत्य सादर करत असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपूर्वी प्रतिमा शेलार यांनी करत तक्रार दाखल केली होती
लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. मात्र आता गौतमी पाटील हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. गौतमी पाटील हिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रतिभा शेलार यांनी केली आहे. गौतमी विरोधात सातऱ्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अश्लिल हावभाव करत नृत्य सादर करत असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपूर्वी प्रतिमा शेलार यांनी करत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत सातारा न्यायालयाने गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. गौतमी पाटील हिच्या नृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर टीका करण्यात आली होती. त्यावेळीच गौतमीवर लावणी क्षेत्रातील अनेकांनी टीका केली होती. त्यानंतर गौतमीने जाहीर माफी देखील मागितली होती.
Published on: Jan 24, 2023 02:59 PM